युवा नेते उत्तम पाटील यांचे नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष यांना आवाहन
वार्ताहर / बोरगाव
निवडणुकांपुरतेच राजकारण करून त्यानंतर राजकारण बाजूला ठेवावे. निवडणुका संपल्यानंतर सर्वांनीच विकासकामांना प्राधान्य दिले पाहिजे. नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी सुद्धा पदभार स्वीकारल्यानंतर गावातील सर्व कामांना प्राधान्य देत राजकारण विरहित कामे करून विकास साधावा, असे मत युवानेते उत्तम पाटील यांनी
व्यक्त केले.
बोरगाव येथे बेनाडी, गळतगा व बारवाड ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष उपाध्यक्षांनी युवा नेते उत्तम पाटील यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. तसेच अरिहंत उद्योगसमूहातर्फे उत्तम पाटील यांनीही निवड झालेल्या बारवाड ग्रामपंचायत अध्यक्षा सुवर्णा जाधव व उपाध्यक्ष आनंद चौगुले, बेनाडी ग्रामपंचायत अध्यक्ष सुषमा भौरे व उपाध्यक्ष जयदीप गुरव, गळतगा ग्रामपंचायत अध्यक्ष सुरेखा पुणे व उपाध्यक्ष पूजा हेगडे यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार, संजय कागे, आनंद गिंडे, बसगोंडा पाटील, रमेश पाटील, प्रकाश गिंडे, तानाजी चौगुले, गिरिधर निगवे, अशोक क्षीरसागर, अण्णाप्पा जिरगे, बाबुराव खोत, भरत मंगावते, प्रभाकर देसाई, भागोजी बन्ने, पुंडलिक ढवळे, शशिकांत अर्जुनवाडी, विजय पाटील, अमोल जाधव, नगरसेवक अभयकुमार मगदूम प्रदीप माळी व इतर मान्यवर उपस्थित होते.