विधान परिषदेतील मुख्य प्रतोद महांतेश कवटगीमठ यांची मागणी
प्रतिनिधी / चिकोडी
चिकोडी हा शैक्षणिकदृष्टय़ा जिल्हा केंद्र असून लोकसभा क्षेत्र आहे. तसेच या उपविभागात 8 विधानसभा मतदारसंघ असून येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी राज्य सरकारचे विधान परिषदेतील मुख्य प्रतोद महांतेश कवटगीमठ यांनी अधिवेशनाच्या प्रश्नोत्तरात केली.
ते म्हणाले, बेळगाव जिल्हय़ात वैद्यकीय महाविद्यालयांची मागणी वाढली आहे. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने देशात वैद्यकीय महाविद्यालये वाढावीत यासाठीचे नियम शिथिल केले आहेत. बेळगाव मोठा जिल्हा असून येथे बिम्स व केएलई वैद्यकीय महाविद्यालये आहेत. चिकोडी येथे शैक्षणिक जिल्हा केंद्र असून तेथे वैद्यकीय महाविद्यालयाची गरज असून, येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे अशी मागणी केली.
यावेळी उत्तर देताना वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी बेळगाव हा मोठा जिल्हा असून स्थानिक मागणीनुसार कुठे आवश्यकता आहे, मूलभूत सुविधांची उपलब्धता पाहून पीपीपी मॉडेलमध्ये प्रति÷ित खासगी संस्था किंवा व्यक्ती पुढे आल्यास वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत विचार करण्याचे आश्वासन दिले.
तसेच 35 ते 40 पंचायत सदस्य असलेल्या मोठय़ा ग्रामपंचायतींना काम करण्यात अडचण असल्यामुळे 15000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा किंवा नगर परिषदेचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली. याला उत्तर देताना नगरविकास मंत्र्यांनी नगरविकास खात्याच्या नियमानुसार पात्रता पाहून व जिल्हाधिकाऱयांकडून प्रस्ताव मागून यावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
मोठय़ा ग्रामपंचायतींना नगर पंचायतींचा दर्जा द्या
ग्रामपंचायतींच्या बाबतीत बोलताना कवटगीमठ यांनी अधिवेशनात सन 2015 च्या लोकसंख्येच्या आधारावर ग्रामपंचायतींचा दर्जा उंचावण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. तसेच बेळगाव जिल्हय़ात अनेक मोठय़ा ग्रामपंचायती असून त्यातील काही नगरपंचायती करण्यात आल्या आहेत. बेळगाव जिल्हय़ातील खानापूर तालुक्मयातील इटगी, हुक्केरी तालुक्मयातील हत्तरगी, चिकोडी तालुक्मयातील केरूर, रायबाग तालुक्मयातील कुडची ग्रामीण, अथणी तालुक्मयातील (संकोनट्टी) अथणी ग्रामीण, कागवाड तालुक्मयातील मंगसुळी, मोळे, बेळगाव तालुक्मयातील सांबरा, हिरेबागेवाडी, कंग्राळी, काकती या 15 हजारावर लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती असून त्यांचा दर्जा उंचावणे आवश्यक असल्याचे सांगितले.