ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत मागील 24 तासात 158 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 07 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 35 हजार 639 वर पोहचली आहे. यामधील 1,194 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 165 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 6 लाख 23 हजार 574 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 10,871 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 09 लाख 67 हजार 628 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 42,395 आरटीपीसीआर टेस्ट आणि 24,839 रैपिड एंटिजेन टेस्ट एका दिवसात करण्यात आल्या आहेत.