टास्मानियाच्या ब्राइडस्टो लवेंडर फार्मला भारतीयांची प्रतीक्षा
ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणेचा प्रांत टास्मानिया येथील ब्राइडस्टो लवेंडर फार्मला भारतीय पर्यटकांची प्रतीक्षा आहे. 45 हजार हेक्टरमध्ये फैलावलेल्या या फार्ममध्ये लवेंडरची 6.66 लाख रोपे आहेत. या फुलझाडांच्या रांगाची लांबी 200 किलोमीटर इतकी आहे.
येथील प्रेंच लवेंडर व्हरायटीचा वापर अत्तर आणि खाद्यपदार्थांमध्ये केला जातो. फार्मचे मालक रॉबर्ट रेवन यांच्यानुसार सर्वात उत्साहपूर्ण प्रतिसाद भारतीय पर्यटकांकडून मिळाला आहे. तमिळ चित्रपट ‘बॉयज’मधील ‘अले-अले’ या गाण्याचे चित्रिकरण याच फार्ममध्ये पार पडले आहे. तेव्हापासून भारतीय पर्यटकांचा येथील ओघ वाढला आहे.
कोरोनाचा प्रभाव
कोरोनाचा प्रभाव या फार्मवरही पडला आहे. पूर्वी दरवर्षी सरासरी 85 हजार पर्यटक यायचे. सध्या विदेशींसाठी सीमा बंद झाल्याने ही संख्या निम्म्यावर आली आहे. व्यवसाय कमी झाल्याने कर्मचाऱयांची संख्याही 75 वरून कमी होत आता 25 वर आली आहे.
शतक पूर्ती
फुलांचे हे फार्म लंडनच्या परफ्यूम व्यापारी सी.के. डेनी यांनी 1921 मध्ये वसविले होते. त्यांनी स्वतःसोबत फ्रान्सच्या दक्षिण भागातून लवेंडरच्या विशेष प्रकारची बियाणे आणली होती. याच बियाण्यांमधून जगातील सर्वात मोठय़ा लवेंडर फुलांच्या बगिच्याची सुरुवात झाली.









