उपाध्यक्षपदी नेत्रा लोहार बिनविरोध
वार्ताहर / नंदगड
कसबा नंदगड ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाबळेश्वर सातेरी धबाले (झुंजवाड) विजयी झाले आहेत. तर उपाध्यक्षपदासाठी नेत्रा नामदेव लोहार (कसबा नंदगड)यांची बिनविरोध निवड झाली.कसबा नंदगड ग्रामपंचायतीचे अध्यक्षपद सामान्यांसाठी होते. अध्यक्षपदासाठी महाबळेश्वर सातेरी धबाले(झुंजवाड) विरुद्ध शितल विनायक पाटील(भुतेवाडी) यांच्यात निवडणूक लागली. ग्रामपंचायतीच्या सर्व 13 सदस्यांनी मतदानात सहभाग दर्शविला. यापैकी महाबळेश्वर धबाले यांना सात मते, तर शीतल पाटील यांना सहा मते मिळाली. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी महाबळेश्वर धबाले यांना विजयी घोषित केले.उपाध्यक्ष पद अ वर्ग महिलेसाठी होते. या पदासाठी नेत्रा नामदेव लोहार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील, सुजाता पाटील, विजय पाटील, सोमव्वा हळब, बशीर देशपाईक, सुशीला सुतार, विठ्ठल पाटील, मंजुनाथ धबाले, गंगा बिष्टेकर , नंदा कोलकार आदींनी सहभाग दर्शवला.वरील दोघांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. चुरशीने झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाबळेश्वर धबाले विजयी झाल्याने त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करून विजयोत्सव साजरा केला.









