वृत्तसंस्था/ मेलबोर्न
ऑस्ट्रेलियाचा टेनिसपटू निक किर्गिओसने जवळपास एक वर्षांच्या कालावधीनंतर टेनिस क्षेत्रात आपले दमदार पुनरागमन केले आहे. येथे सुरू असलेल्या एटीपी मरे रिव्हर खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत मंगळवारी किर्गिओसने फ्रान्सच्या मुलरचा पराभव करून विजयी सलामी दिली.
एटीपी टूरवरील सुरू असलेल्या 250 दर्जाच्या पुरूषांच्या या टेनिस स्पर्धेत किर्गिओसने मुलरचा 3-6, 6-4, 7-6 (7-4) असा पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या सँडग्रेनने आपल्याच देशाच्या जॉन पॅट्रीक स्मिथचा 6-3, 5-7, 6-4 असा पराभव करत दुसऱया फेरीत स्थान मिळविले. सँडग्रेनचा पुढील सामना इटलीच्या केरूसो बरोबर होणार आहे.









