प्रतिनिधी / सांगली
मराठा आरक्षणासह मराठा व ओबीसी समाजाची स्वतंत्रपणे जनगणना करण्यात यावी. शैक्षणिक शुल्क माफ करावे. मराठा समाजाच्या वसतिगृहाचा प्रश्न निकालात काढावा. या प्रमुख मागण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात डॉ. संजय पाटील, अशोक पाटील कोकळे कर, नितीन चव्हाण, सतीश साखळकर, पद्माकर जगदाळे, मंगेश चव्हाण, अजय देशमुख, धनंजय भिसे, महेश खराडे, विश्वजीत पाटील, बाळासाहेब पाटील आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील , युवा नेते पृथ्वीराज पवार, धीरज सूर्यवंशी, अभिजीत भोसले, अजिंक्य पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला.