माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना टोला
प्रतिनिधी / कोल्हापूर
कर्नाटक सरकार जर मुंबईवर आपला हक्क सांगत असतील तर मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी सर्वप्रथम मोदींच्या जागी मला पंतप्रधान करा, असे म्हटले पाहिजे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राहिला पाहिजे यासाठी 69 जणांनी बलिदान दिले आहे. त्यामुळे मुंबई हि महाराष्ट्राचीच आहे. एखाद्या प्रांतावर हक्क सांगताना तेथील भाषिक संख्येचा विचार करावा लागतो. कर्नाटकचा मुंबईवर हक्क सांगणे हस्यास्पद आहे, असा टोला माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना लगावला.
कन्नड रक्षक वेदीकेबाबत शिवसेनेची भुमिका काय असणार असे विचारले असता माजी आमदार क्षीरसागर म्हणाले, एखाद्या प्रांतावर हक्क सांगताना तेथील भाषिक संख्येचा विचार करणे आवश्यक असते. सीमाभागातील बेळगांव, निपाणी, कारवार, धारवाडसह संयुक्त महाराष्ट्र लढÎातील सर्व गावांमध्ये मराठी भाषिकांची बहुसंख्या आहे. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटकमधील हि गावे महाराष्ट्रात आणण्यासाठी लढा देत आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारसह कन्नड रक्षक वेदिकेडून अन्याय केला जात आहे.