ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
नव्या कृषी कायद्यांविषयी देशभरात जनजागृती करण्याचा निर्णय भारतीय किसान युनियनने घेतला आहे. देशातील वेगवेगळ्या भागात जाऊन आपण ही मोहीम राबविणार असल्याचे युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी आज जाहीर केले.
जोपर्यंत कायदे मागे घेतले जाणार नाहीत. तोपर्यंत घरवापसी नाही, असाही निर्धार करत हे आंदोलन ऑक्टोबरपर्यंत संपणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.