बेळगाव : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन व पेट्रोलियम कॉन्झर्वेशन रिसर्च असोसिएशन (पीसीआरए) तर्फे सक्षम संरक्षण क्षमता महोत्सवांतर्गत बेळगावच्या विभागिय कार्यालयातर्फे सायक्लोथॉन महोत्सवाच्या जागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रविवारी घेण्यात आलेल्या या जागृती सायक्लोथॉन रॅलीचा कर्नाटक राज्य रिटेल सेलचे प्रमुख व्यवस्थापक श्रीधर, विभागीय रिटेल सेल्स व्यवस्थापक बेन्नीकुमार यांच्या हस्ते ध्वज उंचावून शुभारंभ करण्यात आला.
250 हून अधिक स्पर्धकांचा सहभाग असलेल्या या रॅलीत लहान मुले, युवा, वयस्कर, दिव्यांग आदी सायकलपटूंनी भाग घेतला होता. इंधनाचे महत्व व इंधन बचत याबाबत जागृती करण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आरपीडी क्रॉस, गोवावेस, रेल्वे ओव्हरब्रिज, गोगटे सर्कल व आरपीडी क्रॉसवरील इंडियन ऑईल कार्यालयापर्यंत या रॅलीचा मार्ग होता. वरि÷ व्यवस्थापक डी. एन. परब, साहाय्यक व्यवस्थापक वामसीकृष्ण, अश्वीन व्ही. चैतन्या मधुकर चव्हाण, रमेश कोकणे, राजू सुतार, आरती सुभेदार, वंदना नलवडे यांच्या हस्ते सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी इंडियन ऑईल कार्पोरेशन लि.चे सर्व सभासद, पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









