चेन्नई विमानतळावर कस्टमची कारवाई
वृत्तसंस्था/ चेन्नई
संयुक्त अरब अमिरात अर्थात युएई येथून आलेल्या प्रवाशांकडून 4.15 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. कस्टम विभागाने ही कारवाई केली असून याची 2.17 कोटी रुपये किमत आहे.सोने तस्करीचा हा प्रकार असून याप्रकरणी कस्टमने 7 जणांना अटक करुन या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या सातजणांनी पॉलिथिन आणि रबर कव्हरमध्ये सोने लपवून त्याच्या कॅप्सुल बनवल्या होत्या. व त्या गिळून त्याची तस्करी केली जात होती.
चेन्नई कस्टम विभागाने दिलेल्या माहितीनुसार एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱयांनी संशयावरुन या सातजणांना रोखून ठेवले होते. 22जानेवारीमध्ये ते दुबई आणि शारजहातून भारतात आले होते. त्यांच्याकडे आठ दिवस कसून चौकशी सुरु होती. अखेर त्यांनी सोन्याच्या कॅप्सूल करुन गिळल्या असल्याचे कबूल केले. त्यांना शासकीय रुग्णालयात भरती करुन डॉक्टरांच्या तज्ञ पथकाच्या नेतृत्वाखाली या कॅप्सुल बाहेर काढण्यात आल्या. याचे वजन 4.15 किलो भरलेअसून त्याची किमत 2.17 कोटी रुपये असल्याचेही अधिकाऱयांनी सांगितले.









