वार्ताहर / कसबा सांगाव
कसबा सांगाव ग्रामपंचायतीकडून गायरान जमीनीत केलेले अतिक्रमण काढताना दिपक माने या तरूणाने विरोध केला ग्रामपंचायत कार्यालयासमोर अंगावर डिझेल ओतुन घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. वेळीच पोलीसांनी तरूणाला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला
ग्रामपंचायत अतिक्रमण हटाव मोहिम सुरू केली होती, गायरान मधील गट.नं ४९२ जमीणीत अतिक्रमण करून आरसीसी बांधकाम करत असलेली दिपक प्रल्हाद माने यांच्या भिंती व कॉलम पाडण्यात आले. तसेच शेती विद्या मंदीर शाळेचा जुना मार्गावरील बसवण्यात आलेला विनायक आवळे यांचा खोका काढण्यात आला. ग्रामपंचायत प्रशासनाने अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटीसीद्वारे कळविले होते. ही कारवाई पोलीस बंदोबस्तात करण्यात आली.
अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केल्यावर ग्रामपंचायत कार्यालयासमोर दिपक माने याने अंगावर डिझेल ओतुन घेऊन पेटवुन घेण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलीसांची धावपळ उडाली पोलीसांनी वेळीच त्याला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. विनायक आवळे यांचा खोका काढताना सहाय्यक पोलीस निरिक्षक दिपक वाकचावरे, ग्रामसेवक एस पी कांबळे व विनायक आवळे यांच्यात वादावादी झाली. बाबासाहेब मगदूम, विक्रमसिंह माने , सुदर्शन मजले, सागर माळी,लखन हेगडे, बाबय्या स्वामी, यांनी मध्यथी करण्याचा प्रयत्न केला. शेवटी विनायक आवळे यांनी स्वःताहुन खोका काढुन घेतला. यावेळी ग्रामस्थांनी तोबा गर्दी केली होती. यावेळी सहाय्यक पोलीस निरिक्षक दिपक वाकचावरे व पोलीस कर्मचारी यांच्या संयमी भुमिकेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. ग्रामसेवक एस.पी.कांबळे, तलाठी दिंगबर पाटील, पोलीस पाटील, कोतवाल संजय बेडकाळे, पोलीस प्रशासन ग्रामपंचायत कर्मचारी अतिक्रमण हटाव मोहिमेत उपस्थित होते.
गावात सुमारे १९० खोकीधारक ग्रामपंचायतीच्या जागेत व्यवसाय करीत आहेत. काही जणांनी मोक्याची जागा हडप करून बांधकाम केले आहे. त्या अतिक्रमणाचे काय अशी चर्चा ग्रामस्थात अनेकांनी अतिक्रमण केले आहे. अतिक्रमण काढताना सरसकट काढावे, जाणीवपूर्वक अन्याय का करता असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. या कारवाई वेळी ग्रामपंचायत सदस्यांची अनुपस्थिती ची चर्चा घटनास्थळी सुरू होती.
गायरान जमीन गट.नं. ४९२ मध्ये दिपक माने याने अतिक्रमण करून बांधकाम सुरू केले होते. याबाबत वारंवार नोटीस देण्यात आल्या होत्या त्यानुसार न्यायालयात दावा दाखल करून न्यायालयाचा निकालानुसार अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले आहे. तसेच विनायक आवळे याने शेती विद्या मंदीर शाळेच्या मुख्य मार्गावर खोका टाकून अतिक्रमण केले होते. तेही काढण्यात आले. पुढील काळात कोणीही अतिक्रमण करू नये अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल.- ग्रामसेवक कांबळे