प्रतिनिधी / इस्लामपूर
इस्लामपूर-खेड रस्त्यावर शेतात पाणी गेल्याच्या कारणावरून अशोक आनंदराव पाटील (रा. उरुण इस्लामपूर ४५) यांचा लोखंडी गजाने पाठीमागून डोक्यात वार करून निर्घृण खून केला. ही घटना आज १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. हल्लेखोर हा खून करून पसार झाला आहे. मयत हे पाटकऱ्याचे काम करत होते. हल्लेखोर हा भावकितीलच असल्याचे समजते.








