प्रतिनिधी / बेळगाव
येथील सरदार्स हायस्कूल मैदानावर रविवारी एका अनोळखीचा मृतदेह आढळून आला आहे. खडेबाजार पोलिसांनी 40 ते 45 वषीय अनोळखीचा मृतदेह ताब्यात घेतला असून त्याची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
2 फेब्रुवारीपर्यंत या अनोळखीचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात ठेवण्यात येणार आहे. 4 फूट 8 इंच उंची, अंगाने सडपातळ, काळसर वर्ण, गोल चेहरा असे त्याचे वर्णन आहे. त्याने आपल्या अंगावर निळे व पांढरे चौकडा फुल शर्ट, निळी जीन्स पँट परिधान केली आहे. मैदानावर झोपेत असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे. या अनोळखीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा उलगडा शवचिकित्सा अहवालानंतरच होणार असून मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी संबंधितांनी खडेबाजार पोलीस स्थानकाशी 0831-2405232 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









