प्रतिनिधी / बेळगाव
सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले विजय मोरे यांनी कोल्हापूर येथील पंचगंगा स्मशानभूमीला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत बेळगाव महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी संजय डुमगोळ आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी कोल्हापूर महानगर पालिकेतर्फे राबविण्यात येणारी उपायोजना आणि अंतिम विधीसाठी वापरण्यात येणारे लाकूड तसेच शेणीच्या नियोजनाबद्दल कोल्हापूर महापालिकेचे आरोग्य अधिकारी विजय पाटील यांच्याकडून माहिती जाणून घेतली. यावेळी कोल्हापूर पंचगंगा स्म्शानभूमीतील कर्मचाऱयांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्याकडून करण्यात येणाऱया कामाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे विभाग प्रमुख अरविंद कांबळे, आश्कनि गणी आजरेकर व कर्मचारी तसेच बेळगाव महानगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित
होते.









