बेंगळूर : पाच वर्षाच्या आतील मुलांना पोलिओचे दोन थेंब देऊन देश आणि राज्य पोलिओमुक्त करण्यासाठी सरकार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी केले आहे. रविवारी गृहकार्यालय ‘कृष्णा’ येथे बालकाला पोलिओचा डोस देऊन पल्स पोलिओ लसीकरण अभियानाचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. कोरोना परिस्थितीमुळे सर्व प्रकारची खबरदारी घेऊन पल्स पोलिओ लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे. पुढील तीन दिवस पाच वर्षांच्या आतील मुलांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे. राज्यात एकूण 64 लाख बालकांना डोस देण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. 17 जानेवारी रोजी पल्स पोलिओ लसीकरण अभियान राबविण्यात येणार होते. मात्र, कोरोना परिस्थितीमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. आता लसीकरणासाठी आरोग्य खात्याने तयारी केली आहे, असेही ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









