बेंगळूर/प्रतिनिधी
ई-वाहनांना चालना देण्यासाठी आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठी राज्यात दोन लिथियम बॅटरी उत्पादक प्रकल्प उभारले जातील, असे उपमुख्यमंत्री सी.एन. अश्वथ नारायण यांनी शनिवारी सांगितले. दरम्यान एक युनिट हुबळी-धारवाड आणि दुसरे चिक्कबळ्ळापूर येथे असेल. तसेच आम्ही अद्याप अचूक स्थान निश्चित केले नाही, असेही ते म्हणाले.
ई-वाहन रॅलीचा शुभारंभ केल्यानंतर ते म्हणाले, “ई-वाहनांना मोठा फायदा देण्यासाठी राज्य अनुकरणीय उर्जा धोरणाची तयारी करीत आहे.” 2018 मध्ये, ई-वाहन धोरण राबविणारा कर्नाटक देशातील पहिले राज्य होते. याअंतर्गत, ग्राहकांना सवलत देण्यात आली आहे आणि प्रति युनिट ५ रुपये शुल्क आकारले जात आहे, जे व्यावसायिक वापरासाठी विजेचे दर आहे. “आम्ही आमच्या अपग्रेड केलेल्या पॉलिसीमध्ये आणखी काही देण्याची योजना आखली आहे. यामुळे ई-वाहने अधिक स्वस्त होऊ शकतील, असे ते म्हणाले.
उओमुख्यमंत्र्यांनी नवीन धोरणात राज्यभरात पेट्रोल बंकच्या धर्तीवर बॅटरी बँक स्थापन करण्यास मदत होईल, असे म्हंटले आहे.
बेसकॉम बेंगळूरमध्ये अधिक चार्जिंग स्टेशन स्थापित करण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून काम करेल. यापूर्वीचत्यांनी १५० चार्जिंग स्टेशन सुरू केले आहेत. राज्यात ईव्ही-चार्जिंग इकोसिस्टम निर्माण करण्यासाठी वीज औपयोगितास नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या सहकार्याने काम करण्यास सांगितले आहे. जर सर्व काही नियोजनानुसार झाले तर ग्राहक प्री-चार्ज केलेल्या बॅटरी भाड्याने घेण्यास आणि वापरण्यास सक्षम असतील,असेही ते म्हणाले.