ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाला संबोधित करताना देशाच्या राजधानीत प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचाराबद्दल दुःख व्यक्त केले.

मोदी म्हणाले, 26 जानेवारीला दिल्लीत तिरंग्याचा अपमान पाहून देश अतिशय दुःखी होता. आपल्याला नवी आशा आणि नवनिर्मितीसाठी वेळ द्यावा लागेल. आम्ही गेल्या वर्षी विलक्षण संयम आणि धैर्याची ओळख करून दिली. यंदाही आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागेल आणि आपले संकल्प सिद्ध करावे लागतील.
नवीन वर्षात होत असलेला मोदींचा हा पहिलाच कार्यक्रम होता. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होत असतो. या कार्यक्रमात शेवटी मोदी म्हणाले, कृषी कायद्यांविरोधातील आंदोलक शेतकरी आणि सरकार यांच्यात अंतिम तोडगा भलेही निघाला नसेल, पण सरकार शेतकऱ्यांसमोर पर्याय ठेवत आहे. शेतकऱ्यांनी यावर चर्चा करावी.









