बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात शनिवारी ४६४ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर दोन संबंधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान राज्यात ४६४ बाधित रुग्णांसह एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९,३८,८६५ वर पोहोचली आहे. तसेच राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत एकूण १२,२१३ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात दिवसभरात ५४७ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. शनिवारी बेंगळूरमध्ये २३३ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले.
राज्यात एकूणच ९३८,८६५ कोविड -१९ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून यापैकी ९,२०,६५७ रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. तर १२,२१३ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात सध्या ५,९७६ बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी १४७ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. शनिवारी झालेले दोन्ही मृत्यू बेंगळूरमधील आहेत.
आतापर्यंत एकूण १,६९,५८,४७९ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. दरम्यान शनिवारी ७३,४८८ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे.









