दाट धुक्मयामुळे दुर्घटना – 24 जण जखमी
मुरादाबाद / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशमध्ये मुरादाबाद-आग्रा महामार्गावर शनिवारी दाट धुक्मयामुळे विचित्र अपघात घडला. प्रवाशांनी भरलेली मिनीबस डीसीएमला आदळल्यानंतर ट्रकला धडकली. मुरादाबादच्या कुंदरकीजवळ नानापूर येथे शनिवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली. या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. दाट धुक्मयामुळे हा अपघात झाल्याची शक्मयता वर्तवण्यात येत असल्याने अपघाताच्या नेमक्मया कारणांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा अपघात इतका भीषण होता की तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.









