ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त लखनऊ येथील हजरतगंज येथील गांधीजींच्या पुतळ्यास हार अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, 30 जानेवारी रोजी संपूर्ण देश महात्मा गांधी यांची पुण्यतिथी शहीद दिन म्हणून साजरा करतो.
यावेळी मुख्यमंत्री योगी म्हणाले की, गांधीजींच्या शिकवणुकीमुळे भारत-सर्वोत्कृष्ट भारत निर्मितीचा मार्ग अधिक मोठा झाला आहे. गांधीजींनी जगाला सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखविला. आज आपण त्यांची आठवण काढत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली यावेळी त्यांच्यासोबत कॅबिनेट मंत्री ब्रजेश पाठक आणि महेंद्रसिंगही यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, गांधीजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी लखनौमधील हजरतगंजची वाहतूक दोन मिनिटे थांबली होती. या वेळी लोकांनी शांतपणे त्यांना श्रद्धांजली वाहिली.