अजय हेडा यांचे मत : रोटरी क्लब वेणुग्रामतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सेवाभावी पुरस्काराने सन्मान
प्रतिनिधी / बेळगाव
संधी मिळाली की त्याचे सोने करण्याचे कसब महिलांकडे असते. समाजाच्या विविध क्षेत्रात महिला उल्लेखनिय कामगिरी बजावत आहेत. कर्तृत्ववान आणि समाजाला योगदान देणाऱया महिलांचा सत्कार करणे हे रोटरी आपले कर्तव्य समजते. इतकेच नव्हे तर अशा महिलांना रोटरीचे मानद सदस्यत्व द्यावे, अशी अपेक्षा रोटरीचे उपप्रांतपाल अजय हेडा यांनी क्यक्त केली.
रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामतर्फे गुरुवारी मेसॉनिक हॉलमध्ये विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना सेवाभावी पुरस्कार (व्होकेशनल अवॉर्ड) देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर वेणुग्रामचे अध्यक्ष अशोक काडापुरे, सचिव डॉ. जगत्शंकरगौडा, व्होकेशनल सेवा संचालक संजीव देशपांडे उपस्थित होते.
प्रारंभी अशोक काडापुरे यांनी बैठकीची घोषणा केली. जागतिक शांतता व सौहार्द यासाठी एक मिनीट मौन पाळण्यात आले. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या नागरत्ना रामगोंडा, तरुण भारतच्या ज्ये÷ पत्रकार मनीषा सुभेदार, शास्त्राrय गायिका समीरा मोडक, निवृत्त फ्लाईट लेफ्टनंट दीक्षा शुक्ला, उद्योजिका गिरीजा शेट्टी व केएलई वेणुध्वनीच्या सुमिता देसाई यांचा सत्कार करण्यात आला. त्यांचा परिचय अनुक्रमे डॉ. भीमसेन, डी. बी. पाटील, विजय पाटील, शशिकांत नाईक, विनयकुमार बी. व उमेश रामगुरवाडी यांनी करून दिला.
जयश्री काडापुरे यांनी सत्कारमूर्तींना शाल अर्पण केली. अजय हेडा यांनी सन्मानचिन्ह दिले तर अशोक काडापुरे यांनी पुष्पगुच्छ दिले. यावेळी नागरत्ना यांनी एड्सबाधित मुलांसाठी अनेक संस्था काम करतात. परंतु मुलींसाठी आपण काम करत असून समाजाच्या सहकार्याची गरज आहे, असे सांगितले. मनीषा सुभेदार यांनी आज पत्रकारितेचे आयाम बदलले असून अनेक प्रश्नांना पत्रकारांना सामोरे जावे लागते, असे सांगितले. कोरोनाकाळातील पत्रकारितेबद्दल आपले अनुभव कथन करून संपूर्ण तरुण भारत परिवारातर्फे आपण सत्कार स्वीकारत असल्याचे सांगितले.
सुनीता देसाई यांनी कोरोनाकाळात अनेक वंचितांपर्यंत मदत कशी पोहोचविली याबद्दल माहिती दिली. दीक्षा शुक्ला यांनी हवाईदलातील अनुभव सांगून मुलींनी या क्षेत्राकडे यावे, असे आवाहन केले. गिरीजा शेट्टी यांनी मनुष्यबळ विभागात काम करण्याचा अनुभव सांगितला तर समीरा मोडक यांनी कोरोनामुळे कलाक्षेत्र उपेक्षित राहिले असून कलेला रसिकांचा आश्रय हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली. यानंतर अजय हेडा यांनी सत्कारमूर्तींचे अभिनंदन करून रोटरीने त्यांना सदस्यत्व द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. जगत्शंकरगौडा यांनी पुढील उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन संजीव देशपांडे यांनी केले.









