मौजेदापोली/वार्ताहर
काही दिवस थंडी गायब झालेली असताना पुन्हा दापोलीत थंडीची लाट आल्यामुळे दापोलीकर चांगलेच गारठले आहेत.गेले तीन दिवस दापोलीचा किमान तापमान 11 अंश सेल्सिअसवर स्थिरावला असल्याचे विद्यापीठाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीवरून समोर आले आहे. यामध्ये 27 जानेवारी रोजी दापोलीचा किमान तापमान 11.5 अंश सेल्सिअस, 28 जानेवारी रोजी 11.1 तर 29 जानेवारी रोजी 11.2 अंश सेल्सिअस इतका नोंदविण्यात आला आहे.
थंडीची तीव्रता पोषक मिळत असल्यामुळे बागायतदार मात्र सुखावला आहे. अनेक आंब्याच्या झाडांना मोहोर फूटू लागला आहे. तसेच पर्यटक देखील गुलाबी थंडीचा अनुभव घेण्याकरीता येत असल्याचे समोर येत आहे. महिनाभर थंडीने पाठ फिरवली होती. त्यामुळे थंडी पडणार की नाही अशा चिंतेत असलेल्या दापोलीकरांना मात्र थंडीने चांगलीच हुरहुडी भरली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









