बेळगाव : शब्दगंध कवी मंडळाची बैठक आश्विनी ओगले यांच्या निवासस्थानी पार पडली. अध्यक्षस्थानी कवयित्री वंदना कुलकर्णी होत्या. बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. कोरोना महामारी व त्याचा परिणाम, 27 फेब्रुवारी 2021 रोजी मराठी भाषा दिन साजरा करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आल्या. मराठी भाषा, संस्कृती परंपरा, साहित्य समृद्ध करण्यासंबंधी वेळोवेळी दर महिन्याला कार्यक्रम, बैठक आणि कविता सादरीकरण करण्याचे उपक्रम राबविल्यासंदर्भात विशेष नियोजन करून जागृती निर्माण करणे, शनिवार दि. 6 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा करण्याचे ठरले. प्रमुख वक्त्या म्हणून राणी चन्नम्मा विद्यापिठाच्या विभाग प्रमुख प्रा. डॉ. मनिषा नेसरकर यांची निवड करण्यात आली. यावेळी प्रा. स्वरूपा इनामदार यांनी स्वागत केले. प्रास्ताविक करून साहित्याविषयी विचार कवयित्री अश्विनी ओगले यांनी मांडले. कवयित्री स्मिता किल्लेकर यांनी वार्षिक अहवाल वाचून मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. अशोक आलगोंडी यांनी केले. तर कवी प्रा. निलेश शिंदे यांनी आभार मानले.
याप्रसंगी सुनंदा मुचंडी – देसाई, अस्मिता आळतेकर, जी. बी. ईनामदार, पुष्कर ओगले, दिपक किल्लेकर उपस्थित होते. याप्रसंगी कवी कवयित्रींचे कविता सादरीकरण झाले.









