प्रतिनिधी / बेळगाव
बेकिनकेरे येथील नागनाथ को-ऑप. पेडिट सोसायटीतर्फे प्रजासत्ताक दिन साजरा केला. ध्वजारोहण सोसायटीचे चेअरमन अंबाजी सावंत यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता म. गांधीजींच्या प्रतिमांचे पूजन व्हा. चेअरमन सोमनाथ सावंत यांनी केले. सल्लागार कृष्णा भोगण यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. याप्रसंगी संचालक चंद्रकांत भोगण, मल्लाप्पा गावडे, गंगाराम कृष्णा सावंत, नारायण सावंत यासह सल्लागार लक्ष्मण शिंदोळकर, कृष्णा भोगण, गंगाराम लक्ष्मण सावंत, रमेश शिंदोळकर, व्यवस्थापक संजय पाटील, भाग्यश्री तोरे, नागेश्वरी भडांगे, कर्मचारी देमाणी गावडेसह ग्रामस्थ उपस्थित होते.
कुरिहाळ प्राथमिक मराठी शाळा
कुरिहाळ येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेत प्रजासत्ताक दिन मंगळवारी साजरा करण्यात आला. नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्य दया यल्लाप्पा बसर्गे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रारंभी मुख्याध्यापक सुरेश अष्टगी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मुख्याध्यापक सुरेश अष्टगी यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष लक्ष्मण कुदनूरकर, उपाध्यक्ष कांचन शेडेकर, नामदेव बसर्गे, गजानन इंचनाळकर, परशराम इंचनाळकर मेघदेव इंचनाळकर, अंगणवाडी शिक्षिका रेणुका बसर्गे, सुनिता पाटील, अश्विनी सुतार, सुर्यकांत लोहार, सुजाता शहापूरकर, नारायण इंचनाळकरसह शिक्षक उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते राजू कडोलकर, इराप्पा हालभावी, अब्दुल गर्णा सय्यद, कल्लाप्पा जंबळी यांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. अर्जुन पाटील यांनी आभार मानले.
उचगाव मळेकरणी सोसायटी
उचगाव येथील मळेकरणी पेडिट सोसायटीतर्फे भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. ध्वजारोहण संस्थेचे संस्थापक चेअरमन जवाहर देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. फोटो पूजन शालू फर्णांडिस, संचालक किशोर पावशे यांनी केले. दीपप्रज्वलन डॉ. के. डी. पाटील, प्रताप देसाई, मारुती देसाई, शांताराम पाटील, आडव्याप्पा कुरबूर, मलाप्पा कुरबूर यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन बी. आर. देसाई यांनी केले. के. एन. कदम यांनी आभार मानले. यावेळी संस्थेचे संचालक मंडळ, ठेवीदार, सभासद, कर्मचारी उपस्थित होते.
उचगाव येथील सार्वजनिक गांधी चौक
उचगाव येथील सार्वजनिक गांधी चौकामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रा. पं. सदस्य, आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष व नागरिकांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांनाविना साधेपनाने ध्वजारोहण कार्यक्रम साजरा करण्यात आला.
पीडीओ प्रकाश कुडची यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ग्रा. पं. सदस्या अंजना जाधव, रुपाली गिरी, स्मिता खांडेकर, अम्रिना बंकापूर, अनुसया कोलकार, नागरत्न कोरडे यांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले. ग्रा. पं. सदस्य लक्ष्मण चौगुले, बंटी पावशे, यादो कांबळे, बी. एस. होनगेकर, संभाजी कदम, बाळासाहेब देसाई उपस्थित होते. स्वागत व सूत्रसंचालन एन. ओ. चौगुले यांनी केले.
मुक्तांगण विद्यालय
मुक्तांगण विद्यालयाच्या पटांगणात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा सुधारणा कमिटी सदस्य दत्ता शेनवी यांनी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन केले. शाळेचे चेअरमन यु. एन. गुरव यांनी ध्वजारोहण केले. यावेळी शाळेचे व्हा. चेअरमन एस. एम. जाधव, सेक्रेटरी दिगंबर राऊळ, सदस्य, रुपा देशपांडे, अर्जुन भेकणे तसेच शाळेचे शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला.
सुळगे (ये.) ग्राम पंचायत
सुळगे (ये.) ग्राम पंचायतीतर्फे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. पीडीओ दुर्गाप्पा ताशिलदार यांनी ध्वजारोहण केले. नवनिर्वाचित ग्रा. पं. महिला सदस्यांच्या हस्ते महात्मा गांधीजी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी ग्रा. पं. अध्यक्ष व विद्यमान सदस्य अरविंद पाटील यांनी दीपप्रज्वलन केले.
सुळगे (ये.) भावकेश्वरी सोसायटी
सुळगे (येळ्ळूर) येथील श्री भावकेश्वरी कृषी पत्तीन संघातर्फे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. ध्वजारोहण चेअरमन रामचंद्र नंद्याळकर यांनी केले. म. गांधी फोटो पूजन उपाध्यक्ष एन. आर. पाटील यांनी केले. संचालक बी. बी. पाटील यांनी विचार मांडले.
यावेळी संचालक हिरामणी बेळगावकर, आनंद कामती, सुभाष कुकडोळकर, सुलोचना पाटील, डी. टी. पाटील, प्रा. सी. वाय. कामती उपस्थित होते. रवि पाटील यांनी प्रास्ताविक केले.
कणबर्गी येथील सिद्धेश्वर हायस्कूल
कणबर्गी येथील जनता शिक्षण संस्था सांबरा संचलित श्री सिद्धेश्वर हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रास्ताविक व स्वागत मोहन अष्टेकर यांनी केले. प्रमुख पाहुणे निवृत्त लिपिक जी. ए. पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
मुख्याध्यापक एस. के. बिर्जे यांनी ध्वजारोहण केले. याप्रसंगी शिक्षक के. ए. बुद्रुक व एस. व्ही. धुळप्पण्णावर यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन एम. बी. मळगली यांनी केले. कार्यक्रमाला एन. बी. पाटील, व्ही. के. ताशिलदार, आर के. काकतकरसह विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते.