ऑनलाईन टीम / श्रीनगर :
दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील शम्सीपोरा भागात बुधवारी दहशतवाद्यांनी लष्कराच्या रस्ता उद्घाटन कार्यक्रमाला लक्ष्य करून जवानांवर ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात लष्कराचे चार जवान जखमी झाले असून, त्यांना प्राथमिक उपचारानंतर लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लष्कराच्या प्रवक्त्याने या हल्ल्याला दुजोरा दिला आहे.
ग्रेनेड हल्ल्यानंतर शम्सीपोरा परिसराला घेराव घालून, शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.दरम्यान, मागील महिन्यात सौरा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या एका नागरिकाचा एसकेआईएमएस हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.









