हातकणंगले/ प्रतिनिधी
अनेक दिवसापासूनसर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या ग्रामपंचायत सरपंच आरक्षणाची आज तहसीलदार कार्यालयांमध्ये चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली. या वेळी अनेकांना लॉटरी लागली तर अनेकांची पत्ते कट झाल्याचे उपस्थितांमध्ये बोलले जात होते . नुकत्याच झालेल्या हातकणंगले तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीनंतर शासनाने सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांचे डोळे या आरक्षणाच्या सोडती वर लागून राहिले होते . त्यामुळे निवडणुकीला सामोरे जाणारा प्रत्येक उमेदवार सरपंच पदाची आपल्याला लॉटरी लागणार हे निश्चित करूनच निवडणुकीला सामोरे गेले होते . मात्र आज अनेकांची सोडत जाहीर झाल्यानंतर पते कट झाल्याचेही बोलले जात होते तर काहींना लॉटरी लागली आहे . यामुळे उपस्थित असणाऱ्या नागरिकांमध्ये कभीखुशीकभीगम चे वातावरण निर्माण झाले होते . आज तालुक्यातील साठ ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले. यात नुकत्याच झालेल्या 21 ग्रामपंचायतीसह इतर ग्रामपंचायतीचे आरक्षण पुढील प्रमाणे –
*अनुसूचित जाती …
सावर्डे, कोरोची ,तळंदगे, जुने पारगाव, वाठार तर्फे वडगाव, इंगळी
*अनुसुचित जाती स्त्री प्रवर्ग…
किणी, रुकडी, नागाव ,कबनूर, नरंदे ,चंदुर पट्टणकोडोली.
*नागरिकांचा मागास प्रवर्ग…
नेज, चोकाक, हेरले, तासगाव, खोतवाडी, अतिग्रे, माले कापूरवाडी .
*नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री…
तारदाळ, रूई,दुर्गेवाडी, मजले ,मौजे वडगाव, हलोंडी तळसंदे ,अंबप.
*नागरिकांचा सर्वसाधारण प्रवर्ग….
साजणी, तिळवणी, मानगाव ,जंगमवाडी, यळगुड, आळते, हिंगणगाव ,मुडशिंगी , चावरे, मनपाडळे, निलेवाडी , टोप, कासारवाडी ,अंबपवाडी, लाटवडे, खोची.