बेंगळूर/प्रतिनिधी
दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या माजी सहाय्यक व्ही. के. शशिकला यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. आज चार वर्षांची शिक्षा संपल्यानंतर बुधवारी सकाळी बेंगळूरच्या परप्पन अग्रहरा तुरुंगातून सोडण्यात आले.
दरम्यान, शशिकला यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जात असल्याने त्या रूग्णालयातच राहतील. परप्पन अग्रहरा तुरूंगातीलअधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज शशिकला यांना सोडण्यात आले आहे, आणि सर्व औपचारिकता रुग्णालयात पूर्ण झाली असल्याचे सांगितले.
बेंगळूर मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, शशिकला जाणीवपूर्वक, सावध आणि सुदृढ आहे, त्यांच्या नाडीचा दर ७६ / मिनिट आहे आणि रक्तदाब १६६/८६मिमी एचएच आहे. दरम्यान त्यांना तिला रुग्णालयातून कधी डिस्चार्ज दिला जाईल हे अस्पष्ट आहे.