बेंगळूर/प्रतिनिधी
२०१७ मध्ये बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निकटवर्तीय व्ही. के. शशिकला यांना २७ जानेवारीला, बेंगळूरच्या परप्पन अग्रहरा तुरूंगातून सोडण्यात येणार आहे. दरम्यान काही दिवसापूर्वी शशिकला यांना ताप आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यांनतर त्यांचो कोरोना टेस्ट केल्यानंतर त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. यांनतर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.
दरम्यान शशिकला यांच्या वकिलांनी कायदेशीर औपचारिकता पूर्ण झाल्याचे सांगत त्यांना तुरुंग अधिकाऱ्यांना शिक्षा पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले आहे. त्यांनी त्यावर प्रक्रिया देत त्या बुधवारी त्या तुरूंगातून सुटतील आणि त्यानंतर प्रमाणपत्र देतील. स्थानिक पोलीस ठाण्यालाही याची माहिती दिली जाईल. एकदा सर्व औपचारिकतांची दखल घेतल्यास, तुरूंगातील अधिकारी त्यांना प्रदान केलेली सुरक्षा काढून टाकतील. त्यानंतर कर्नाटक पोलीस त्यांचे संरक्षण वाढवायचे की नाही याचा निर्णय घेईल, अशी माहिती देण्यात आली आहे.









