- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.25 % कोरोनामुक्त!
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 3,080 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 19 लाख 15 हजार 344 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 95.25 % आहे.

दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 1,842 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 20 लाख 10 हजार 948 वर पोहचली आहे. सध्या 43 हजार 561 रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात 30 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर मृतांचा एकूण आकडा 50 हजार 818 एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.53 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 42 लाख 57 हजार 998 नमुन्यांपैकी 20 लाख 10 हजार 948 (14.10 %) रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 07 हजार 971 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 2 हजार 360 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- मुंबईत दिवसभरात 348 नवे रुग्ण

मुंबईत कालच्या दिवसात 348 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 508 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3,06,393 वर पोहचली आहे. तर 2,88,023 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कालच्या एका दिवसात 07 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर मृतांची एकूण संख्या 11,307 इतकी आहे. सद्य स्थितीत 6,6159 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.








