सातारा / प्रतिनिधी :
इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग दि.27 पासून सुरू होणार आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील शाळांमधील शिक्षकांच्या कोरोना चाचणी केली जात आहे. जावली तालुक्यातील बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्रात शिक्षकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले.
यावेळी निपाणीच्या केंद्रप्रमुख अलका संकपाळ,नितीन जाधव, संतोष लोहार, आदिनाथ कदम, नंदकुमार केंजळे, धनसिंग सोनवणे, धनाजी कदम, सुजाता जाधव, संतोष कदम, इम्तियाज तांबोळी उपस्थित होते.
वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मोरे यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी यांनी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.