प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 98 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 1366 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
1366 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
जिल्हा रुग्णालय सातारा येथील 90, कराड येथील 232, फलटण येथील 43, कोरेगाव येथील 26, वाई येथील 103, खंडाळा येथील 2, पानमळेवाडी येथील 570, महाबळेश्वर येथील 10, दहिवडी येथील 150, म्हसवड येथील 34, पिंपोडा 26, तरडगाव येथील 30 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 50 असे एकूण 1366 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
एकूण नमुने – 307446
एकूण बाधित -55946
घरी सोडण्यात आलेले -53458
मृत्यू -1811
उपचारार्थ रुग्ण-677