बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी शुक्रवारी असा इशारा दिला की, दोन्ही विभागांना वेगळे केल्याने राज्यातील कोविड-१९ लसीकरण प्रयत्नांना नुकसान होऊ शकते.
“आता लसीचा प्रभारी कोण असेल? या प्रश्नाचे उत्तर देणे मला कठीण आहे. मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन, असे सुधाकर यांनी पत्रकारांना सांगितले. ऑक्टोबर २०२० मध्ये मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सुधाकर यांच्याकडे आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री पदाचा कार्यभार सोपविला होता.
गुरुवारी, येडियुरप्पा यांनी मंत्रिमंडळात बदल करत नव्या मंत्र्यांना खातेवाटप केले. यामध्ये ज्येष्ठ मंत्री जे सी सी मधुस्वामी यांना वैद्यकीय शिक्षण दिले. “आम्ही कोविड लसीकरण प्रक्रियेत आहोत. काही ६०-७० टक्के जिल्हा रुग्णालये वैद्यकीय शिक्षणाखाली येतात आणि काही आरोग्य विभागांतर्गत असतात. जर दोन्ही विभाग एकाच कमांडच्या अधीन असतील तर ही मदत होईल, असे ते म्हणाले.