सातारा / प्रतिनिधी :
साताऱ्यातील सदर बाजार परिसरात 7 ते 8 मोकाट कुत्र्यांच्या टोळक्याने एका लहान मुलीवर हल्ला केला. हा सर्व प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
सदर बजार परिसरात असलेल्या कत्तलखान्यामुळे या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावर जास्त प्रमाणात असून, अनेक वेळा लहान मुलांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी कल्याणी शाळेसमोर मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात एका मुलीचा मृत्यू झाला होता. मोकाट कुत्र्यांनी मुलीचे भर दिवसा शरीराचे लचके तोडल्याची दुर्दैवी घटना घडली होती. अशाच प्रकारचे हल्ले सदर बजारमध्ये होऊ लागल्याने कल्याणी शाळेसमोरील घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सातारा नगरपालिका प्रशासनाने या प्रकरणात वेळेत लक्ष घालून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.