बेंगळूर/प्रतिनिधी
येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप मंत्रिमंडळात काही आमदारांचा समावेश केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्र्यांनी ७ आमदारांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. दरम्यान मंत्र्यांचा शपथविधी झाला पण मंत्रिमंडळाचे खातेवाटप केले नव्हते. कर्नाटकच्या राज्यपालांनी शुक्रवारी जारी केलेल्या शासकीय अधिसूचनेनुसार मंत्र्यांना वाटप केलेल्या खात्यांची नावे खालील प्रमाणे…
जे. सी.मधुस्वामी : वैद्यकीय शिक्षण, हज आणि वक्फ
अरविंद लिंबावळी : वन, कन्नड आणि संस्कृती
एम. टी. बी. नागराजः नगरपालिका प्रशासन, ऊस विकास व साखर संचालनालय
के गोपाळय्याः अबकारी
आर. शंकर : बागायती आणि रेशीम पालन
के. सी. नारायण गौडा: युवा सशक्तीकरण, खेळ, नियोजन, कार्यक्रम देखरेख आणि सांख्यिकी
येडियुरप्पा यांनी १३ जानेवारी रोजी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला होता. त्यांनी सात नवीन मंत्र्यांचा समावेश करून मंत्रिमंडळाची संख्या ३३ वर नेण्यासाठी प्रयत्न केले. फेरबदलानंतर गुरुवारी त्यांना विभागांचे वाटप करण्यात आले.