पन्हाळा / प्रतिनिधी
धबधबेवाडी ता.पन्हाळा येथे दिनांक 18 जानेवारी रोजी निवडणुकीच्या निकालानंतर दोन गटात झालेल्या वादावादीत पन्हाळा पोलिस ठाण्याचे कर्मचारी मारुती पाटील यांना डोक्यात काठी लागल्याने ते जखमी झाले.
याप्रकरणी सरकारी कामात अडथळा केल्याने दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.यातील संजय दिनकर पोवार,जयसिंग भिकाजी खोपकर,सुजित वसंत खोपकर,तानाजी आनंदा खोपकर,ओंकार राजाराम खोपकर,राहुल आनंदा पाटील,नंदकुमार दत्तु कांबळे यांना अटक होवुन न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.तर निवृत्त पोलिस कर्मचारी हिंदुराव लक्ष्मण पाटील यांना अटक झाली असुन त्याची प्रक्रुती बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील मुख्य संशियत आरोपी सतिश अंकुश खोपकर हा फरार झाला होता.मात्र आज त्याला पन्हाळा पोलिसांनी ताब्यात घेवुन अटक केली आहे.
धबधबेवाडी गावात कोरे विरुद्ध सत्यजीत पाटील गटात ग्रामपंतायतीच्या निवडणुकीत सामना रंगला होता.यामध्ये कोरे गटाने सात पैकी सात जागा जिंकल्या आहे.दरम्यान विजयी उमेदवारांनी जल्लोष करत असताना दोन गटात वादावादी झाली.यावेळी जमावाला शांत करण्यासाठी गेलेले पोलिस कर्मचारी मारुती पाटील याला सतिश अंकुश खोपकर यांने पाठीमागुन येवुन पोलिस कर्मचाऱ्याच्या डोक्यात काठी मारल्याने मारुती पाटील जखमी झाले होते.त्यानुसार या गुन्ह्यातील सतिश खोपकर हा मुख्य संशियत आरोपी तीन दिवसापासुन फरार झाला होता.पण आज अचानक हा आरोपी अटक झाल्याने यात काही राजकीय षडयंत्र असणाची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान,धबधबेवाडी काही पोलिस खात्यातील कर्मचाऱ्यांनीच याला अश्राय देत पाठबळ दिले असल्याचे गावात बोलले जात आहे.त्यांमुळे या गोष्टीचा सखोल तपास जिल्हा पोलिसप्रमुखांनी स्वत:लक्ष देवुन करावे अशी मागणी होत आहे.









