प्रतिनिधी / सातारा
जगात शांतीचा संदेश देण्यासाठी राजस्थान राज्यातील अजमेरची अल्ट्रा रनर सुफिया खान ही 2018 पासून मिशन होप या उपक्रमातंर्गत धावते आहे. साताऱयात ती बुधवारी सकाळी आली होती. तिचे साताऱयातील महिला धावपट्टूंनी अनोखे स्वागत केले. वाढे फाटा ते शिवराज चौक या दरम्यान तिच्यासोबत धावत जावून तिला साथ दिली. काही धावपट्टूंनी तिच्यासोबत कराडपर्यंत धावत जावून तिच्या उपक्रमांला शुभेच्छा दिल्या. साताऱयातील महिला धावपट्टूंनी तिच्यासोबत नऊवारी साडीत तिच्यासोबत धावून स्वागत केले. दरम्यान, तिच्या साताऱयातील स्वागतामुळे यावर्षी होणाऱया सातारा हाफ हिल मॅरेथॉनमध्ये महिला धावपट्टूंचा सहभाग वाढणार आहे.
साताऱयाला सातारा हाफ हिल मॅरेथॉनमुळे एक नवी ओळख आहे. त्यामुळे धावणे सातारकरांचे सुरुच असते. त्यामध्ये महिलांची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे. साताऱयात राजस्थानच्या अल्ट्रा रनर सुफिया खान या येणार असल्याची माहिती सातारच्या महिला धावपट्टूंना मिळाली होती. त्यानुसार त्यांचे स्वागत भाविका मुथा, डॉ. पोर्णिमा फडतरे, डॉ. अश्विनी देव, डॉ. पल्लवी पिसाळ, डॉ. रणजिंता गोळे यांनी साताऱयाच्या वेशीवर धावत जावून गेले. सुफिया खान या 33 वर्षाच्या आहेत. त्यांनी 87 दिवसात 4 हजार 35 किलोमीटर अंतर पार केले. आता मिशन होप या उपक्रमांतर्गत जगामध्ये शांतीचा संदेश देण्यासाठी तिने भारताचा सुवर्ण चतुषकोण असलेल्या दिल्ली मुंबई चेन्नई कोलकत्ता असे अंतर धावून पुर्ण करण्यासाठी ती धावत आहे. तीने आतापर्यंत 22 शहरांना धावत भेटी दिल्या आहेत. भाईचारा, समानता, एकता आणि शांती हा संदेश देत ती धावत आहेत. सातारच्या महिला धावपट्टंनी तिच्यासोबत वाढे फाटा ते शिवराज पट्रोल पंपापर्यंत साथ दिली.
केबीपी ग्रुपही धावला सोबत
बुधवारी सकाळी सुफिया साताऱयातून धावत जाणार आहे अशी माहिती केबीपीच्या मैदानावर धावण्याचा सराव करणाऱया सातारकरांना समजले. तेव्हा लगेच सगळे धावपट्टू मैदानावरुन तेथे पोहचले. तिच्यासोबत सर्वच धावपटू् धावले. यामध्ये अभियंता, डॉक्टर, अधिकारी, व्यावसायिकांचा समावेश होता.
साताऱयाच्या दोघींनी तिच्यासमवेत 42 किलोमीटर अंतर धावल्या
सातारा शहरातून पुढे सुवर्ण चतुष्कोण करण्यासाठी धावत जाणाऱया सुफिया खान हिच्या स्वागतासाठी व तिला शुभेच्छा देण्यासाठी साताऱयातील सौ. दीपाली यादव व डॉ. शुभांगी गायकवाड या दोघीजणी तब्बल 42 किलोमीटर धावल्या. तसेच हिरकणी ग्रुपच्या अर्पणा शिंगटे यांच्यासह त्यांच्या ग्रुपने नऊवारी साडीमध्ये सोबत धावून स्वागत केले.
सुफियांकडून प्रेरणा घेवुन सातारा हाफ हिलमध्ये महिलांनी सहभाग घ्यावा
चालू वर्षीच्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याचा आमचा हेतू आहे. त्या अनुषंगाने यावर्षी महिलांची टीमच कार्यरत असणार आहे. सुफियाचे आमच्या महिलांच्या टीमने जोरदार स्वागत केले. तिच्यापासून प्रेरणा घेवून सातारच्या महिलांनीही जास्तजास्त सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये भाग घ्यावा, असे आवाहन सातारा हिल हॉफ मॅरेथॉनचे डॉ.संदीप काटे यांनी केले आहे.