प्रतिनिधी / दापोली
रायगड जिल्ह्यातील रोहा येथून दापोली तालुक्यातील शिरशिंगे येथे सेंट्रींगच्या कामाकरीता आलेल्या लुईस नामक कामगाराचा वय 30 डोक्याच्या मागे जोरदार प्रहार करून निर्घुण खून झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकाराने खळबळ उडाली असून पोलीस मारेकर्याचा तपास घेत आहेत.
लुईस हा मूळ ओरिसा राज्यातील रहिवाशी होता. तो सेंट्रींगच्या कामाकरिता रोहा येथे भाड्याची खोली घेऊन राहत होता. तेथे त्याची राजेश बोडरे -वय 50 यांच्याबरोबर ओळख झाली. या ओळखीतून राजेश बोडरे याने त्याला दापोली येथे काम करण्याबाबत सुचवले.यानंतर हे दोघे दापोलीतील शिरशिंगे गावातील पिंपळाचा माळ येथील एसआरसिटीमध्ये सेंट्रींगच्या कामाला 7 जानेवारी रोजी रुजू झाले.
राजेश आणि लुईस हे जर एकाच छताखाली कामाच्या ठिकाणी राहत होते. तर याचा खून झाल्यावर राजेशला आवाज कसा आला नाही ? याबाबत पोलिसांनी राजेशकडे सखोल चौकशी केली. त्याच्या जबाबात विसंगती आढळून आल्याने राजेश याला पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.