सातारा / प्रतिनिधी :
आंबेदरे, आव्हाडवाडी येथे आज सकाळी दुचाकी चालकावर बिबट्याने हल्ला केल्याची अफवा पसरली होती. याबाबत वनविभागाच्या कार्यालयाकडे चौकशी केली असता वनविभागाचे सुहास भोसले यांनी ते वृत्त खोटे असून, तसा कोणताही प्रकार झाला नसल्याचे सांगितले.









