बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात सोमवारी कोविड-१९ लसीकरण मोहिमेदरम्यान लसीकरणाची एकूण ४७ टक्क्यांची नोंद झाली होती. रविवारी आणि शनिवारी या मोहिमेदरम्यान अनुक्रमे ५८.४ आणि ६३ टक्क्यांनी घट झाली आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण सेवा विभागाच्या माहितीनुसार सोमवारी तब्बल ३८,२४२ लाभार्थ्यांना लसी देण्यात आली तर उद्दीष्ट ८१,२१९ होते.
त्याचबरोबर, बीबीएमपीचे आयुक्त एन. मंजुनाथ प्रसाद यांनी लक्ष्यित लाभार्थ्यांपैकी ४२ टक्के लोकांना सोमवारी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीत लस देण्यात आली. सर्वाधिक लसीकरण आरआर नगर (७४ टक्के), त्यानंतर बीबीएमपी वेस्ट (६७ टक्के) आणि बीबीएमपी दक्षिण (५७ टक्के ) लसीकरण नोंद असल्याची माहिती स्थानिक नागरी संस्थेने दिली आहे.