नागरिकांना दिलासा : जिल्हय़ात 336 जणांचे अहवाल निगेटिव्ह , चार नवे रुग्ण
प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या 24 तासांत बेळगाव शहर व जिल्हय़ातील 336 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर 4 नवे रुग्ण आढळून आले असून बेळगाव शहर व तालुक्मयात सोमवारी एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. अद्याप 5 हजार 794 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहे.
जिल्हय़ातील गोकाक, राजापूर, निपाणी, खानापूर येथे सोमवारी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 26 हजार 545 इतकी झाली असून त्यापैकी 26 हजार 38 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. सध्या 165 सक्रिय रुग्ण आहेत.
अद्याप 41 हजार 894 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. आतापर्यंत 4 लाख 44 हजार 304 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 4 लाख 9 हजार 449 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. सक्रिय रुग्णांवर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.









