मुंबई
अनेकविध चर्चांच्या फेऱयानंतर पिरामल कॅपिटलला डीएचएफएलसाठीची बोली जिंकण्यात यश मिळालं असल्याचे सांगण्यात येते. पिरामलचा डीएचएफएलच्या अधिग्रहणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कर्जात बुडालेल्या दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या अधिग्रहणासाठी विविध कंपन्यांकडून बोली लावण्यात आली होती. या बोलीत पिरामलने अखेर बाजी मारली आहे. याकरीता ओकट्रीनेदेखील बोली लावली होती. पण पिरामलने बाजी जिंकताना 38 हजार कोटींची बोली लावली होती.









