प्रतिनिधी / बेळगाव
राजहंसगडाला ऐतिहासीक वारसा लाभला असून येथे येणार्या प्रत्येकाने गडाचे पावित्र राखणे आवश्यक आहे. रोट्रॅक्ट क्लब ऑफ वेणूग्राम बेळगावतर्फे गडावर कोणत्याही प्रकारचा कचरा पसरु नये यासाठी डस्टबिनची सोय केली असून याचा सर्वांनी वापर करावा असे आवाहन माजी ग्राम पंचायत सदस्य सतिश कुगजी यांनी केले. रोट्रॅक्ट क्लबतफें शुक्रवारी राजहंसगडावर डस्टबिन देण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे कुगजी व राजु पावले होते. क्लबचे अध्यक्ष मेहुल अनिल शहा यांनी क्बलतर्फे राबविण्यात येणार्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी मयुर कदम, विराज पाटील, अनिकेत जाधव, हर्ष शिंदे, हिमांशु पोरवाल, ऋषभ दोरकाडी, क्षितीज महेश्वर, सुष्टी हुलकती, रोहन कदम, निखिल कत्ती, निरज वंटमुरी आदी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









