प्रतिनिधी / सांगली
जत तालुक्यातील शेगावजवळ सोने विक्रीसाठी निघालेल्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून व बेदम मारहाण करीत अडीच कोटी रुपयांचे सोने पळवून नेणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यामधील अडीच कोटीचे सोने जप्त करण्यात आले आहे. पोलिसांच्या तीन पथकानी संयुक्त पणे ही कारवाई केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी दिली. याप्रकरणी प्रवीण चव्हाण, विजय नांगरे, विशाल कारंडे, तात्यासाहेब गुसाळे, वैभव माने यांना अटक करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी, आटपाडी तालुक्यातील पलसखेड सोने व्यापारी बाळासाहेब वसंत सावंत हे बेळगावहुन चार किलो सोने घेऊन आपल्या चारचाकी गाडीतून नांदेड येथे सोने देण्यासाठी निघाले होते, गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास ते शेगाव जवळील माणेवस्ती येथे लघुशंकेसाठी गाडीतून उतरले. याचवेळी त्यांचा ओमनी गाडीतून पाठलाग करणाऱ्या पाच आज्ञात दरोडेखोरांनी व्यापारी सावंत व त्यांच्या जोडीदारास बेदम मारहाण करून व डोळ्यात चटणी टाकून त्यांच्याकडील अडीच कोटीचे चार किलो सोने लंपास केले, या प्रकरणी जत पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता








