बेंगळूर/प्रतिनिधी
कोविशील्डनंतर कोवॅक्सिनचे २० हजार डोस गुरुवारी बेंगळूरला पोहोचले. कोवॅक्सिनला दोन ते आठ डिग्री तापमानात ठेवले होते. आजच्या लसीकरणात या लसीचा वापर केला जाणार आहे.
दरम्यान आरोग्य व वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी काही दिवसांतच लस दाखल होईल असे त्यांनी सांगितले होते. त्यांनी नमूद केले की डोसच्या प्रमाणात तसेच दोन लसींमध्ये काही विशिष्ट फरक नाही. आजपासून पासून लसीकरण मोहिमेत या दोन्ही लसींचा वापर केला जाईल.
कोवॅक्सिनच्या एका कुपीमध्ये १० मिली लस असते, तर कोविशील्डच्या प्रत्येक कुपीमध्ये ५ मिली लस असते. दोन लसींमध्ये हा फरक आहे. कोविशील्डच्या एका कुपीमधून १० लोकांना लसीकरण केले जाऊ शकते. तर कोवॅक्सिनच्या एका कुपीमध्ये २० जणांना लस दिली जाऊ शकते. मात्र लोकांना एक लस निवडण्याचा पर्याय राहणार नाही. मंत्र्यांनी दोन्ही लसींनी सुरक्षित म्हटले आणि लोकांना अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
इंडियन बायोटेक लस भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथील भारत बायोटेकच्या प्रयोगशाळेत या लसीच्या प्रगतीचा आढावा घेतला होता.
दरम्यान भारत बायोटेकच्या लसीशी संबंधित क्लिनिकल चाचण्यांचा डेटा लवकरच आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध होणार आहे. भारत बायोटेक लसीच्या टप्प्यातील चाचणी डेटाचा अभ्यास केला जात आहे.









