बेंगळूर/प्रतिनिधी
शुक्रवारी सकाळी उत्तर कर्नाटकातील हुबळी-धारवाड बायपास रोडवर समोरुन दिशेने येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने १२ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाने शुक्रवारी ट्विट केले आणि म्हटले आहे की, “कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यात रस्ता अपघातामुळे झालेल्या जीवितहानीमुळे दु: ख झाले आहे. या दुःखद घटनेत मी शोकग्रस्त कुटुंबियांसमवेत आहेत. जखमींच्या त्वरित पुनर्प्राप्तीसाठी मी प्रार्थना करतोः पंतप्रधान @narendramodi ”
अपघातात प्रवीणा, पौर्णिमा, प्रीती रविकुमार, मानसी, परमज्योती, राजेश्वरी शिवकुमार, शकुंतला, उषा, वेद, निर्मला, मंजुला आणि रंजनी श्रीनिवास अशी १२ महिलाप्रवाशी ओळखलय आहेत. तर पाच जखमींना स्थानिक रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्वदावणगिरी जिल्ह्यातील असून ते गोव्यात एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी जात होते.
धारवाड शहरातून ८ कि.मी. अंतरावर असलेल्या इटगीट्टी क्रॉसजवळ सकाळी ९ च्या सुमारास टेम्पो डवेनगेरे येथून निघाला होता. टेम्पो समोरच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रकला धडकला. अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.