लष्कर भरतीचे प्रशिक्षण घेणाऱया तरुणाने संपविले जीवन
प्रतिनिधी / बेळगाव
लष्कर भरतीच्या प्रशिक्षणासाठी अनगोळ येथील एका प्रशिक्षण केंद्रात असलेल्या तरुणाने बास्केटबॉलच्या रिंगला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे. टिळकवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
रोहित रामाप्पा तळवार (वय 20, रा. भवानीनगर, मंडोळी रोड) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. अनगोळ येथील काटा मैदानाजवळ असलेल्या गुरुकुल प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर ही घटना घडली आहे. रोहितने नेमके कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली आहे, याचा उलगडा झाला नाही.
रोहितचे मुळ गाव गोकाक तालुक्मयातील सावळगी आहे. मात्र सध्या त्याचे कुटुंबिय भवानीनगर, मंडोळी रोड येथे वास्तव्यास आहे. लष्कर व पोलीस भरतीच्या प्रशिक्षणासाठी त्याला अनगोळ येथील प्रशिक्षण केंद्रात ठेवण्यात आले होते. रात्रीचे जेवण आटोपून बास्केटबॉलच्या रिंगला त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर पुढील तपास करीत आहेत.