तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
गेल्या महिनाभरात घेण्यात आलेल्या पंचायत समिती स्तरावरील शिबिरात 13 हजार कर्मचार्यांपैकी 10 हजार कर्मचार्यांची सेवापुस्तके अद्यावत करण्यात आली आहेत. तर जिल्हा परिषदेतील विविध विभागातील 601 कर्मचार्यांपैकी 580 कर्मचार्यांची सेवापुस्तके अपडेट झाल्याची मिहिती प्रशासनाने दिली.
जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिलेल्या आदेशानुसार तालुकानिहाय सेवापुस्तक अद्ययावत करण्याचे शिबिर घेण्यात आले. यामध्ये महिन्याभरात अक्कलकोट पंचायत समितीत 1 हजार 383 कर्मचार्यांपैकी 737 सेवापुस्तके अपडेट करण्यात आली. बार्शी पंचायत समिती कार्यालयातील 1 हजार कर्मचार्यांपैकी 901 कर्मचार्यांची सेवापुस्तके पूर्ण झाली. तर करमाळा पंचायत समितीमधील 1 हजार 41 कर्मचार्यांपैकी 993 कर्मचार्यांची तर कुर्डूवाडी पंचायत समितीमधील 1 हजार 276 कर्मचार्यांपैकी 1 हजार 261 कर्मचार्यांची सेवापुस्तके अपडेट करण्यात आले. तसेच मोहोळ पंचायत समितीमधील 1 हजार 235 कर्मचार्यांपैकी 642 सेवापुस्तके, मंगळवेढा पंचायत समितीमधील 870 कर्मचार्यांपैकी 832 कर्मचार्यांची सेवापुस्तके अपडेड झाली.
माळशिरसमधील 1 हजार 683 कर्मचार्यांपैकी 1 हजार 556 कर्मचार्यांची सेवापुस्तके अपडेट तर झाली आहेत. पंढरपूर पंचायत समितीमधील 1 हजार 370 कर्मचार्यांपैकी 1 हजार 336 सेवापुस्तके, सांगोला पंचायत समितीमधील 1 हजार 334 कर्मचार्यांपैकी 510 कर्मचार्यांची सेवापुस्तके अपडेट झाली आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील 1 हजार 189 कर्मचार्यांपैकी 910 कर्मचार्यांची उत्तर पंचायत समितीमधील 629 कर्मचार्यांपैकी 536 कर्मचार्यांची सेवापुस्तके पूर्ण झाली आहेत.
Previous Articleइंधन दरवाढीचा भडका
Next Article कोल्हापूर जिल्ह्यात लसीकरण शनिवारी, तयारी पूर्ण









