प्रतिनिधी / सांगली
भंडारा येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी आपल्या अग्निशामक विभागाला मनपा क्षेत्रातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तीन दिवसात ३८६ पैकी ३१० रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यात आले आहे. दरम्यान, अग्निशमन परवाना घेतलेला नाही किंवा अग्निसुरक्षा यंत्रणा बसवलेली नाही अशा आस्थापना तसेच रुग्णालयांनी तात्काळ परवाने घ्यावेत. अग्निशमन यंत्रणा सुसज्ज करावी अन्यथा कारवाई करू असा इशारा अग्निशमन अधिकरी चिंतामणी कांबळे यांनी दिला आहे.








