वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी गॅस वितरण कंपनी गेल (इंडिया) लि. यांच्याकडून समभाग पुनर्खरेदीसाठीचा विचार सुरु आहे. या अगोदर अधिशेष रक्कम समभागधारकांना देण्यात येणार आहे. कंपनीची सर्वात मोठी समभागधारक भारत सरकार आहे. कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक येत्या 15 जानेवारी रोजी होणार असून यामध्ये समभाग पुनर्खरेदीसाठी विचारविनिमय केला जाणार असल्याचे संकेत आहेत. यासोबतच 2020-21 साठी अंतरिम लाभांश देण्यावर विचार करण्यात येणार असून कंपनीने याबाबत सविस्तर माहिती मात्र दिलेली नाही. सध्याच्या घडीला सरकारने कमीत कमी आठ कंपन्यांच्या समभाग पुनर्खरेदीवर विचार करण्यास सांगितले आहे.
सरकार राजकोषीय तोटा नियंत्रित करण्यासाठी कोष जमा करण्यासाठी विविध पर्यायाचा वापर करण्यावर विचारविनिमय करते आहे.









